अपघातात जैन कंपनीतील कर्मचारी जखमी

0

जळगाव- आहुजा नगर येथून जात असलेल्या जैन इरिगेशन कंपनीतील कर्मचार्‍याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. जखमीस सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते परंतू डोक्याला जबर मार लागला असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात सीटीस्कॅनसाठी हलविण्यात आले. गोपाळ निंबा शिरसाठ (वय 35) हे धरणगांव तालुक्यातील बांभोरी येथे राहतात. तर शिरसाठ हे बांभोरी जवळच असलेलया जैन इरिगेशन कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. गुरूवारी सायंकाळी गोपाळ शिरसाठ हे दुचाकीवरून आहुजा नगर येथून जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना लागलीच कंपनीतील काही कर्मचार्‍यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

रूग्णालयात कंपनीतील
अधिकारी देखील हजर झाले होते. सायंकाळी त्यांना रूग्णालयात आणल्यानंतर डोक्याला जबर मार बसल्याने गोपाळ शिरसाळ यांना तात्काळ सिटीस्कॅनसाठी खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.