अपघाताप्रकरणी चाळीसगावात गुन्हा दाखल

0

चाळीसगाव – ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणार्‍या ट्रकवर धडकुन थांबलेल्या कारला समोरुन ठोकल्याने कारमधील 4 जण जखमी झाल्याची घटना 6 मे रोजी तालुक्यातील कन्नड घाटाच्या पायथ्याशी घडली होती. या अपघातासंदर्भात चालकाने फिर्याद दिल्यावरुन आज स्वीफ्ट कार चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद गुणवंतराव साळुंखे (35) रा औरंगाबाद हे औरंगाबाद येथे फार्मा कंपनीत सेल्समन मॅनेजर असुन ते त्यांची मारुती ए स्टार कार क्रमांक एम एच 38 ने औरंगाबाद येथुन चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा येथे लग्न समारंभासाठी त्यांच्या परिवारासह कन्नड घाट मार्गे येत असताना मागावुन भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच 20 सी एस 325 ने त्यांच्या कारला ओव्हरटेक केले व चाळीसगाव कडुन औरंगाबाद कडे येणार्‍या ट्रक क्रमांक एम एच 20 डी 5137 ला ठोस मारली व वेगात असलेली स्विफ्ट कार उलटी फिरुन थांबलेल्या मारुती ए स्टार कारला समोरुन धडक दिल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवुन कारमधील प्रमिलाबाई दुधु पाटील, कलाबाई गुणवंतराव साळुंखे व प्रतिभा प्रभाकर पाटील व ते मुक्का मार लागुन जखमी झाले होते त्यांच्यावर येथील शिंदे अ‍ॅक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले होते.