‘अपना टाईम आयेगा’ रॅप गाणं रिलीझ !

0

मुंबई : ‘गली बॉय’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदा आलिया भट आणि रणवीर सिंगची जोडी एकत्र येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला. या ट्रेलरला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील पहिलं गाणं ‘अपना टाईम आयेगा’ हे रिलीझ झालं आहे.

रॅपरच्या भूमिकेत रणवीरच्या या गाण्याला काही तासातच चाहत्यांनी भरभरुन लाईक आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.