अपसंपदा बाळगणार्‍या उपअभियंत्यासह पत्नीला अटक

0

नंदुरबार एसीबीची परभणीत कारवाई ; आज न्यायालयात हजर करणार

नंदुरबार– उत्पन्नापेक्षा जादा संपत्ती बाळगल्याने नंदुरबार जिल्हा परीषदेचे तत्कालीन उपअभियंता व हल्ली परभणीतील गंगाखेड येथे कार्यरत असलेल्या मोहनलाल बन्सीलाल भोई व त्यांच्या पत्नी चंद्रकला मोहनलाल भोई यांच्याविरुद्ध नंदुरबार एसीबीने बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला होता तर बुधवारी आरोपींना अटक करून पथक पहाटे नंदुरबारात पोहोचले. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी मोहनलाल यांनी नंदुरबारसह शहादा व धुळ्यात कर्तव्यावर असताना ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपदा बाळगल्याचा आरोप आहे. नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक करुणाशील तायडे, एएसआय दीपक फुलपगारे व दीपक चित्ते यांनी आरोपींनी परभणी येथून अटक केली.