अपहार करणार्‍या ठेकेदार व अभियंत्यास अटक

0

जळगाव । बाठवडे बाजारातील मंजूर कामे पूर्ण न करता कागदोपत्री पुर्ण केल्याचे दाखवून 4 लाख 79 हजार 665 रूपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ठेकेदार अरूण साहेबराव पाटील व पुणे कनिष्ठ अभियंता सैय्यद अली यांना जेरबंद केले आहे. दरम्यान, अन्य तिघे फरार असून पोलिस त्यांच्या शोधार्थ आहे.

बोरखेडा पिराचे ग्रामपंचायत अंतर्गत आठवडे बाजारातील मंजूर केलेली काम पुर्ण न करता कागदोपत्री संपूर्ण काम पुर्ण केल्याचे दाखवून ठेकेदार अरूण पाटील, ग्रामविकास अधिकारी व्ही.बी.मोरे, तत्कालीन सरपंच बोरखेड, कनिष्ठ अभियंता सैय्यद अली व पुणे बाजार क्षेत्र अभियंता तुषत्तर पनाटे यांनी संगणमत करून 4 लाख 79 हजार 885 रूपयांचा अपहार केला होता. यातच ग्रामविकारी अधिकारी व तत्कालीन सरपंच यांनी पुन्हा ग्रामपंचायतीकडे जमा असलेली सुरक्षा ठेव रक्कम 75 हजार रूपये ही मुदत पुर्ण होण्यापूर्वीच ठेकेदारास अदा केली होती. अखेर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, फरार संशयितांना अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संशयितांचा शोध घेत असता दोन संशयितांबाबत गुप्त माहिती मिळविली. अखेर ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांचा नंदूरबार, भुसावळ येथे शोध घेत ठेकेदार अरूण पाटील व सैय्यद माजिद अली सैय्यद मसुदअली यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या पथकात सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप शिरसाठ, पोउपनि.नाजिम शेख, छबुलाल नागरे, विजय पाटील, अनिल देशमुख, नरेंद्र वारूळे, दिनेश बडगुजर, गोरख चकोर आदींचा समावेश होता. ही कारवाई वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.