अप्पर तहसिल कार्यालय नायब तहसिलदारपदी परदेशी

0

पिंपरी-चिंचवड : हवेलीच्या आकुर्डीतील अप्पर तहसिल कार्यालयाच्या नायब तहसिलदारपदी विकी परदेशी यांची वर्णी लागली आहे. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते पुण्यातील उपविभागीय कार्यालयात नायब तहसिलदार पदावर कार्यरत होते. महसूल विभागातील पुणे जिल्ह्यात आस्थापनेवर असलेल्या नायब तहसिलदारांच्या पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नुकत्याच बदल्या केल्या आहेत.

विकी परदेशी हे 2006 मध्ये पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. त्यांनी गडचिरोली, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजाविले आहे. त्यानंतर 2012 मध्ये त्यांची महसूल विभागात नायब तहसिलदार या पदावर वर्णी लागली. 2012 ते 2018 दरम्यान पुण्यातील उपविभागीय कार्यालयात नायब तहसिलदार पदावर ते कार्यरत होते. त्यांची नुकतीच आकुर्डीतील अप्पर तहसिल कार्यालयाच्या नायब तहसिलदारपदी बदली झाली होती. त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.