मुंबई : बुलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या भूमिका असलेला बहुचर्चित ‘२.०’ चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रजनीकांतच्या ‘रोबोट’ चित्रपटाचा सिक्वल आहे. ‘रोबोट’ या चित्रपटात रजनीकांतसोब ऐश्वर्यानेही मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे, चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच ‘२.०’मध्ये ऐश्वर्याची भूमिका असणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता खुद्द दिग्दर्शक शंकर यांनीच या गोष्टीचा खुलासा केला आहे.
ऐश्वर्याच्या भूमिकेचा उल्लेख २.० मध्ये आहे, ती प्रत्यक्षात अभिनय करताना दिसणार नाही. मात्र तिच्या भूमिकेचा कथेत अनेकदा उल्लेख आहे.’ त्यामुळे अप्रत्यक्षपणे ऐश्वर्या या सिक्वलमध्ये सहभागी असल्याचे दिग्दर्शक शंकर यांनी म्हटले आहे.