अफगाणिस्तानमध्ये तीन परदेशी नागरिकांची हत्या;एका भारतीयाचा समावेश

0

नवी दिल्ली-अफगाणिस्तानमधील काबूल येथे तीन परदेशी नागरिकांची अपहरण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात एका भारतीयाचा समावेश असून या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

काबूलमधील लॉजिस्टिक कंपनीत काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे गुरुवारी सकाळी अपहरण करण्यात आले. काही वेळाने तिघांचे मृतदेह काबूलजवळील मुसाही जिल्ह्यात सापडले. बंदुकधारी मारेकऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हत्या झालेल्यांमध्ये भारत, मलेशिया आणि मॅसेडोनिया या तीन देशांच्या नागरिकांचा समावेश असल्याचे स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. मात्र, त्या तिघांची नावे आणि अन्य तपशील अद्याप समजू शकलेले नाही.