अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला

0

काबूल: नांगरघर प्रांतात झालेल्या एका आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात ३२ जणांचा मृत्यू तर १२८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी झालेला हा चौथा हल्ला असून मोमंद दराह जिल्ह्यात दहशतवाद्याने आपल्या कपड्यात बॉम्ब लपवून हल्ला केल्याची माहिती मिळाली.

जलालाबादला टोर्खम सीमेशी जोडणाऱ्या महामार्गावर हा हल्ला झाला. हा महामार्ग अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे. याच परिरसरात एका स्थानिक पोलीस कमांडरच्या निषेधार्थ आंदोलन केले जात होते. त्यावेळी हा हल्ला झाला. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हा एकाच दिवसातला चौथा हल्ला असून या आधी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ले झाले. २०१५ पासून दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून निवडणुका, सरकार आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येत आहे.