बारामती । कोणत्याही धर्माबाबत तसेच एकमेकांच्या धर्मासंदर्भात अफवा पसरवू नका, मात्र अफवा पसरवणार्या युवकांचे पोलिस रेकॉर्ड तयार केले जाईल. भविष्यात या रेकॉर्डचा त्रास सतत उद्भवेल त्यामुळे सावध रहून दक्षता पाळली पाहिजे असे मत पुणे ग्रामीण पोलिसचे अधिक्षक सुवेझ हक यांनी व्यक्त केले. बारामती शहर पोलिस स्टेशनच्यावतीने गणपती उत्सव व बकरी ईदच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुवेझ हक बोलत होते. या बैठकीस अप्पर पोलिस अधिक्षक संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, मुख्याधिकारी मंगेश चितळे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, तहसिलदार हनुमंत पाटील, तालुका पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गौड, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सचिन पाटील, पोलिस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे उपस्थित होते.
सध्याच्या परिस्थितीत डीजेमुळे या सण व उत्सवांना अतिशय वेगळे वळण लागलेेले आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बंदोबस्त असता कामा नये, असेही ते म्हणाले.