अफू पावडर बाळगल्याप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

0

भुसावळ- मुक्ताईनगर शहरातील अमृतसर तरंतरण हॉटेलवर गुप्त माहिती आधारे पोलिसांनी धाड टाकत 165 किलो अफू पावडर जप्त केली होती. पोलिसांनी कारवाईप्रसंगी फोटो तसेच व्हिडिओ शुटींग केले होते. या खटल्यात संशयीत आरोपी तथा हॉटेलचा नोकर बद्रीनाथ किसनलाल खराडी (राजस्थान) व कालुराम (मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. संशयीत आरोपी बद्रीनाथतर्फे अ‍ॅड. दिलीप जोनवाल तर संशयीत आरोपी कालुरामतर्फे अ‍ॅड.मनीष सेवलानी यांनी युक्तीवाद केला. साक्षीदारांच्या जवाबातील तफावत व संशयाचा फायदा देत न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.