पुणे । पुण्यातील कस्तुरबा गांधी वसाहत येथे राहणार्या शोभा गोटे यांना महावितरणने घरगुती वीज वापराचे बिल चक्क 52 हजार 230 रुपये आकारले आहे. नेहमी 300-400 रुपये येणारे वीजबील एकदम भरमसाठ आल्याने गोटे यांना धक्काच बसला. दरम्यान, गोटे यांनी औंध येथील महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्यांना तडजोडी अंती 18,980 रुपये बिल भरण्यास सांगितले. त्यामुळे गोटे विवंचनेत पडले आहेत. याविषयी महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणाची शहानिशा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली.