अबरामने फोटो काढणाऱ्यांना केली सक्त मनाई

0

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. त्याच्या मुलांभोवतीही त्याच्या स्टारडमचे वलय आहे. शाहरुखच्या भोवती प्रसारमाध्यमांचा आणि चाहत्यांचा गराडा नेहमी पाहायला मिळतो. या सर्वांची सवय अबरामला नसल्याने तो प्रचंड गोंधळला आणि फोटो काढणाऱ्यांना सक्त मनाई केली.

https://www.instagram.com/p/BqUQcMgHEEb/?utm_source=ig_embed

अलिकडेच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या हिचा वाढदिवस साजरा झाला. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यांच्या मुलांना घेऊन आले होते. यात शाहरुखचा छोटा मुलगा अबरामनेही हजेरी लावली होती. पार्टी संपताच तो घरी जाण्यासाठी बॉडीगार्डसह बाहेर पडला. मात्र, त्याला पाहताच प्रसारमाध्यमांनी त्याचे फोटो काढण्यास सुरुवात केली. अचानक त्याच्याभोवती जमलेल्या गर्दीमुळे तो वैतागला. त्याने स्वत:चा चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘नो पिक्चर्स’ म्हणून फोटो काढण्यास सक्त मनाई देखील केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.