अबॉटच्या ड्रीम सर्व्हेनुसार भारतीय वृद्ध पालकांमध्ये कार्यात्मकतेचा अभाव

0

मुंबई। स्वप्ने पाहण्याचा अधिकार फक्त तरुणानांनाच असतो? मुलांवर लक्ष केंद्रित करायचे म्हणून पालक आपली स्वप्ने पुढे पुढे ढकलत राहतात का? या स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता पुन्हा एकदा त्यांच्यात येईल का? अबॉट या इन्शुअरच्या निर्मात्यांकरवी सर्वेक्षणाच्या माध्यमातून या स्वप्नांची, महत्वाकांक्षांची आणि भारतीय कुटुंब पद्धतीला विशद करणार्‍या विविध मुद्द्यांची उत्तरे शोधण्यासाठी या पालकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. सर्वेक्षणानुसार भारतीय कुटुंब आज आधीपेक्षाही अधिक एकमेकांच्या जवळ आहेत. ते आपली स्वप्ने एकमेकांना सांगताहेत. त्याची चर्चा करतात. मात्र आजवर अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यात अनेक वयस्कर व्यक्तींना क्षमतांचा ताकदीचा अभाव जाणवतो आहे.

मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकताची नोंदणी
इतकेच नाही, दिल्ली आणि चेन्नई मधील काही जेष्ठ पालकांनी तर प्रवास करणे आणि समाजात मिसळणेच बंद केले आहे. शिवाय दैनंदिन कामासाठीही त्यांच्यात फारशी ऊर्जा आणि उत्साह नसल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ड्रीम्स सर्वेक्षणात मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता व हैदराबाद मधील 1200 तरुण व्यावसायिक स्त्री पुरुषांचा सहभाग होता.