अब्याकस स्पर्धेत पाटील इंग्लिश विद्यालयाचे यश

0

एरंडोल : येथील श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश मेडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथील एस.के.अकॅडमी या संस्थेद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अब्याकस चाम्पियनशिप 2016 या स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी उबेद जावेद पिंजारी याने तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले. एरंडोल येथिल श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश मेडियम या शाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी नागपुर येथील अब्याकस स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

या विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग
गिरीश पाटील, निखील पाटील, दर्शन सोनवणे, प्रतिक निकुंभ, शुभम डहाके, दर्शन दुबे, प्रतिक पाटील, उबेद पिंजारी, लाभेश ठक्कर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत उबेद पिंजारी याने प्रथम फेरीच्या तिसर्‍या क्रमांकाने पारितोषिक मिळवले. उबेद पिंजारीच्या यशाबद्दल व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष आमित पाटील, प्राचार्य दिनानाथ पाटील, शिक्षिका प्रियांका मोराणकर व संस्थेच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.