धुळे । आदिवासी विकास प्रकल्प, समाज कल्याण विभाग व महाराष्ट्र शासनामार्फत गेल्या तीन वर्षापासून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. त्यांना शिष्यवृत्ती तातडीने देण्यात यावी, यासह प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना देण्यात आले. यावेळी धनश्री चांदोडे, रोहन अग्रवाल, ज्योत्सना पाटील, गुंजन भोसले, चेतन पाटील, पुजा गुरव, प्रिया नेरकर, विशाल सूर्यवंशी, शुभम देव, गोपाल पाटील, अजय पदमार, यश माहिते, सुबोध साळी, योगेश थोरात, विक्रम पावरा, निलेश पावरा, तनया चौधरी, बॉबी अग्रवाल, तुषार मोरे, पारस पगारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते
या आहेत मागण्या
वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिळणारा भत्ता महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच देण्यात यावा, हैद्राबाद व बंगलोर येथे नर्सिंगचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची मोफत शिक्षणाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीची त्वरित चौकशी व्हावी, त्या विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्र मिळावेत व महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक पात्रतेनुसार प्रवेश देण्यात यावा, शिष्यवृत्ती विभागाच्या अर्ज भरण्याच्या वेबसाईटमध्ये सुसूत्रता यावी, पॅनकार्ड व अधिवा प्रमाणपत्र सक्तीचे करु नये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाार्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.