प्रतिभा महिला प्रतिष्ठानचा वर्धापनदिन साजरा
नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अभिनेता अंशुमन विचारे प्रस्तुत ‘चाल तुरु तुरु’ या कार्यक्रमास सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या नटसम्राट निळु फुले नाट्यगृहातील कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते केक कापून प्रतिष्ठानचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांनी प्रतिष्ठान स्थापनेचा उद्देश व्यक्त केला. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षिमीकरण, आर्थिक विकासासाठी सभासदांना व्यवसाय, राजकीय संधी, विविध मार्गदर्शनपर मेळावे, देवदर्शन यात्रा आदी उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याचे यावेळी शंकर जगताप यांनी सांगितले.
हे देखील वाचा
रसिकांना केले मंत्रमुग्ध
यावेळी अंशुमान विचारे, ृस्नेहा कुलकर्णी, पद्मजा पाटिल यांनी सादर केलेल्या गीतांनी रसिकांची मने जिंकली. सांज ये गोकुळी, मी रात टाकली, हृदई वसंत फुलताना व विविध कोळी गीते सादर करुन या कलाकारांनी रासिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमास ‘ड’ प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक शशिकांत कदम, नगरसेवक सागर आंगोळकर, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, स्वीकृत सदस्य महेश जगताप, उद्योजिका रेखा चोरगे, जयश्री जगताप, शुभांगी जगताप, सुरेखा मोहिते, शुभांगी कदम, नगरसेविका माई ढोरे, उषा मुंढे, शारदा सोनवणे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, आरती चौंधे, निर्मला कुटे, सामजिक कार्यकर्ते दिलीप कांबळे, माऊली जगताप, संतोष ढोरे, शिवाजी निम्हण, सुनील देवकर आदींसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. नामदेव तळपे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.