अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून बाईकस्वाराचा मृत्यू

0

मुंबई : अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून एका बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोव्यात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून या अपघातात झरीनला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं.

गोव्यामधील अंजुना परिसरात हा अपघात झाला. झरीनची कार यु-टर्न घेत असतानाच समोरून आलेली बाईक तिच्या कारवर धडकली आणि त्यात बाईकस्वाराचा मृत्यू झाला. नितेश गोरल असं या बाईकस्वाराचं नाव आहे. त्यानं हेल्मेट घातलेलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी झरीनच्या ड्रायव्हरला अटक केली असून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अभिनेता सलमना खानने झरीनला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. ‘वीर’ हा तिचा हा तिचा पहिला चित्रपट होय. ‘रेडी’, ‘हाऊसफुल-२’, ‘हेट स्टोरी’ या सिनेमात झरीन खानने काम केल आहे.