अभिनेत्री साक्षी तंवरने घेतलं मुलीला दत्तक

0

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री साक्षी तंवरच्या घरी देखील आनंदाचं वातावरण असून साक्षी एका मुलीची आई बनली आहे. साक्षीने एका मुलीला दत्तक घेतलं आहे. दित्‍या रखा असं त्या चिमुकलीचं नाव आहे. दित्या ही 8 महिन्याची आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने म्हटलं होतं की, तिचं कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने आणि आर्शिवादाने तिने एका मुलीला दत्तक घेतलं आहे. साक्षी तिच्या या निर्णयाने खूपच आनंदी दिसत आहे. ती हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असल्याचं मानत आहे.

साक्षीने म्हटलंय की, तिची मुलगी देवी लक्ष्मीचं वरदान आहे. यामुळे तिचं नाव दित्या असं ठेवलं आहे. दित्‍या लक्ष्‍मी देवीचं एक नाव आहे. ज्याचा अर्थ आहे की, ‘जी प्रार्थनांना उत्तर देते.’ साक्षीने दंगल सिनेमामध्येही भूमिका केली आहे. या सिनेमात तिने आमीर खानच्या पत्नीची भूमिका केली आहे. लवकरच साक्षीचा ‘मोहल्‍ला अस्‍सी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये सनी देओल सोबत ती झळकणार आहे. ‘कहानी घर-घर की’ नंतर साक्षीने ‘बडे अच्‍छे लगते हैं’ या मालिकेतून खूप नाव कमावलं होतं. राम कपूर आणि साक्षीच्या जोडीला दर्शकांनी पंसती दिली होती.