पिंपरी : महिला कर्मचार्याची छेड काढल्याप्रकरणी विशाखा समितीने अहवाल सादर करुनही महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर कारवाई झालेली नाही. कारवाई करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर चालढकल करत असल्याचा आरोप, शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी केला आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, कुलकर्णी यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार एका कर्मचारी महिलेने केली आहे. त्या तक्रारीसाठी नेमलेल्या विशाखा समितीने आयुक्तांना दोन महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला. तथापि, कठोर कारवाई करण्याप्रकरणी आयुक्त चालढकल करत आहेत. पीडित कर्मचारी महिलेला नव्हे तर छेड काढणार्या अभियंत्याला संरक्षण देऊन आयुक्त काय साध्य करत आहेत. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे महापालिकेतील महिला कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गहन झाला आहे.