अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

0

भुसावळ । राष्ट्रीय युवक दिन तसेच हिंदी सेवा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यायात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. महाविद्यालयातील 85 भावी अभियंत्यांनी तसेच 15 प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने रक्तदान केले. युवकांचे विचार मानवतावादी असावे त्याचप्रमाणे त्यांचे स्वास्थ हे नेहमीच निरोगी असावे. त्यांच्यामध्ये समर्पणाची भावना तेवत असावी हाच या रक्तदान शिबिराचा मुख्य उद्देश आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे आपण कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो, हीच भावना ठेवून युवकांनी मार्गक्रमण करत आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठावी असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांनी याप्रसंगी सांगितले.

युवकांनी समाजाला दिशा दाखवावी
भारतीय संस्कृतीचा आदर करून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक युवकाने केलाच पाहिजे. कारण युवकच समाजाची दिशा व दशा बदलवू शकतात असा विश्वास भारतीय थोर समाजसेवकांनी आपल्या पुढे मांडला होता. हा विश्वास सार्थक ठरवने हेच युवांचे धेय्य असले पाहिजे असे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल यांनी उपस्थित युवकांना संबोधले.

हिंदी सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष एम.डी. तिवारी, संजयकुमार नाहटा, सत्यनारायण गोडीयाले, डॉ. राहुल बारजिभे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सुधीर ओझा, इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने डॉ. पी.बी. जैन व डॉ. ए.डी. चौधरी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी प्रा. सचिन हरिमकर, प्रा. नितिन खंडारे, प्रा. धिरज पाटील, प्रा. राहुल चौधरी, प्रा. मनोज बडगुजर, प्रा. किशोर पाटील, प्रा. युवराज परदेशी यांनी परिश्रम घेतले.