Murder At Abhone Village चाळीसगाव : दोघा भावंडांमध्ये बैल पोळा सणालाच उद्भवलेल्या वादानंतर दारूच्या नशेतील मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात लोखंडी पास मारली. या घटनेत लहान भावाचा मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील अभोणे गावात शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. शिवाजी तुकाराम पाटील (32, अभाणे) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरा संशयीत पिंटू तुकाराम पाटील (38) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ वादातून भावाचा केला खून
चाळीसगाव तालुक्यातील अभोणे येथे शुक्रवारी बैल पोळा सणाचा उत्साह सुरू असतानाच पिंटू तुकाराम पाटील (38) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (32) यांनी घरी पूजनासाठी बैल आणले मात्र याचवेळी उभयंतांमध्ये कशावरून तरी वाद सुरू झाला व त्याचे पर्यावसन हाणामारीत पोहोचले. संशयीत पिंटू पाटील याने लोखंडी पास शिवाजी याच्या डोक्यावर तीन ते चार वेळा मारल्याने पिंटू जागीच मयत झाला.
मेहुणबारे पोलिसात खुनाचा गुन्हा
रक्तबंबाळ अवस्थेत पिंटू यास चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. खुनाची माहिती कळताच मेहुणबारे पोलिसांनी धाव घेतली.