अभ्यास म्हणजे ज्ञान मिळविण्याची निरंतर प्रक्रिया

0

जळगाव। अभ्यास करत असतांना विद्यार्थ्याच्या मनात जर अविश्वास असेल तर तो अविश्वास दूर करायला सुरुवात करा. अविश्वास दूर झाला कि अभ्यास तुम्ही पूर्ण विश्वासाने कोणत्याही अडचणी शिवाय करू शकतात असे प्रतिपादन एसडी सीडचे समन्वयक प्रवीण सोनवणे यांनी केले. ते एसडी सीडतर्फे आयोजित आभ्यासाचे महत्त्व या कार्यशाळे प्रसंगी बोलत होते.

पालकांचीही उपस्थिती
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी त्यांनी हसत खेळत अभ्यास करावा, त्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ नये या उद्देशाने एसडी सीड तर्फे माध्यमिक विद्यालय बांभोरी येथे 8वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. शिरसाठ तसेच सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हर्निंग बॉडी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.