यावल- शहरातून मोठ्या संख्येने अमरनार्थ दर्शनार्थ गेलेल्या भाविकांना त्या भागात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच मार्गावर दरड कोसळल्याने भोलेनाथांच्या दर्शनाविना परतण्याची वेळ आली. यावल शहरातील 72 स्त्री-पुरूष भाविक अमरनार्थ यात्रेसाठी 27 जून रोजी रवाना झाले होते. 6 जुलैच्या बॅचमध्ये भाविकांचा नंबर होता मात्र अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भली मोठी दरड कोसळल्याने मार्ग बंद करण्यात आला तर तसेच सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे यात्रा थांबवण्यात आल्याने भाविकांना जम्मूमध्येच तीन दिवस मुक्काम ठोकावा लागला. माजी नगरसेवक तुकाराम बारी यांचा गेल्या 20 वर्षात प्रथमच यात्रेत खंड पडला, अशी माहिती ज्ञानदेव फेगडे , राजू फालक यांनी दिली.