भोसरी : येथील आदिनाथनगर येथील फ्लॅटमध्ये एका परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. चार दिवसांपूर्वी नैराश्येतून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. भारती भिमराव ठाकरे (वय 32 रा. सुखवानी कॉम्प्लेक्स, भोसरी मूळ रा. अमरावती)) असे तिचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे ही मूळची विदर्भाची असून भोसरी येथील एका रुग्णालयात परिचारीकेचे काम करत होती. भोसरी येथील आदिनाथनगर येथे असलेल्या हॉस्पिटलच्या फ्लॅटमध्ये रहात होती. आज दुपारी या ठिकाणच्या रहिवाश्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला असता सारा प्रकार उघडकीस आला. तिच्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. तिचे कोणीही नातेवाईक सध्या शहरात राहत नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.