अमळनेर (प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात कोरोनाच्या रुग्णांना काहीही कमी पडणार नाही. त्यांच्यावर चांगले उपचार केले जातील. पण आजही अमळनेर शहरातील कोविड सेंटरमध्ये या रुग्णांना पुरेशे जेवन, पाणी, चहा, नाश्ता मिळत नाही. तर दुसरीकडे कोरोनाची साखली वाढतच चालली आहे. अमळनेरात कोरोनाने थैमान घातले आहे. सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या हलगर्जीपणाचे परिणाम अमळनेरकर जनतेला भोगावे लागत आहेत. अधिकार्यांनी केवळ कागदी घोडे नाचवणे थांबवून ठोस पावले उचलून रुग्णांना सुविधा पुरावाव्यात अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आमदार स्मिताताई वाघ यांनी दिला आहे.