अमळनेरचा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

0
अमळनेर :- समजुतीचा करारनामा देण्यासाठी दोन हजारांची लाच घेणार्‍या अमळनेर पोलीस ठाण्यातील हवालदार संजय श्रावण पाटील यास शनिवारी दुपारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली.
यावल तालुक्यातील हरीपुरा येथील तक्रारदाराने यासंदर्भात तक्रार दिली होती. पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.