अमळनेरातील इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध कार्यक्रम

0

अमळनेर – येथील अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पुष्कर पाटील ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांने महात्मा गांधींची साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. वरद पाटील या विद्यार्थ्यांने गांधीजींवर आधारीत मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य विकास चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यांच्या जिवनपटावर प्रकाशझोत टाकला. यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या आवारात श्रमदान करुन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.