अमळनेर (सचिन चव्हाण) – शहरातील बाजारपेठ भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निकुंभ हाईटस व्यापारी संकुलात संबंधित शॉपिंग कॉम्प्लेक्स मालकाने शौचालय फक्त नावाला नावाला बांधलेले असून ते सदा सर्वकाळ बंद अवस्थेत असलेले पहावयास मिळते परिणामी शौचालयाची पर्यायी व्यवस्था नसल्याने येथील व्यापारी मंडळी तसेच ग्राहक वर्गाला निकुंभ हाईटसच्या मागील बाजूस असलेल्या कोपऱ्यातील मोकळ्या जागेचा वापर करावा लागतो आहे. या जागेच्या पुढील बाजूस अमळनेर नगरपरिषदेचे कार्यालय असून प्रशासन मात्र या सर्व प्रकारच्या गोष्टीकडे डोळेझाक करतांना दिसते आहे.
एकीकडे शासन स्वच्छ भारत मिशन राबवते तर दुसरीकडे जाणूनबुजून दुर्लक्षच करतेय अशाच प्रकारचे चित्र अमळनेर शहरात पहावयास मिळते. तरी लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने या विषयाची शहानिशा करून संबंधितांकडून योग्य तो दंड आकारून तंबी द्यावी, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.