अमळनेर। नोटाबंदी मुळे जिल्हा बँकेसह पगारदार कर्मचारीही अडचणीत आले होते. मात्र किसान कार्ड पाठोपाठ पगारदारांना ही डेबिट कार्ड वाटप केल्याने जिल्हा बँकेने राज्यात सहकार क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले असून कर्मचार्यांवरील ताण कमी होऊन पगारदारांची समस्या मिटली आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर येथे बँकेत ए.टी.एम कार्ड वाटप प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील होत्या. जिल्हा बँक आपुलकीची आणि हक्काची असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेने शिक्षकांचे पगार त्याच दिवशी जमा करावेत असेही सूचित केले. यावेळी पी.एच.पाटील, शिक्षक पी.एल.मेखा, प्रकाश सोनवणे, सुभाष पाटील, लोटन पाटील, मनोज पाटील, संदीप पाटील, सुनील वाघ, प्रकाश पाटील, आरप.बी.पाटील, बी.एच.पाटील, किशोर कदम, राकेश पाटील हजर होते सूत्रसंचालन जे.के.पाटील यांनी तर आभार व्यवस्थापक संजय पाटील यांनी मानले.