अमळनेर । तालुक्याभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेने रुपी कार्ड वाटपाचा निर्णय घेण्यात आला असून ते रुबी कार्ड रद्द करून पूर्वी प्रमाणेच बचत खात्यातून कर्ज वाटप करावे यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना तालुक्यातील शेतकरी यांच्यामाध्यमातून निवेदन 5 रोजी देण्यात येणार असल्याने शेतकर्यांनी जास्तीच्या संख्येने विश्राम गृह धुळे रोड येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकरयाना तालुक्याभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेने रुबी कार्ड वाटपाचा निर्णय घेण्यात आला असून ते रुबी कार्ड रद्द करावे तालुक्यात 50 टक्के शेतकरी अजूनही अशिक्षित आहेत रुबी कार्ड वापरतांना त्यांच्याकडून चुका होऊ शकतात व तशी व्यवस्थाही ग्रामीण भागात करण्यात आलेली नाही.
रुपी कार्ड रद्द करण्याची मागणी
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशात पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंदी केल्यानंतर ऑनलाईन व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाईन पध्दतीने करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आगामी काळात शेतीमालाची विक्री देखील ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येणार आहे. ऑनलाईन व्यवहारासाठी शेतकर्यांना रुबी कार्ड वापरण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकर्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागेल. त्यासाठी जिल्हाधिकारी व चेअरमन जिल्हा मध्यवर्ती बँक यांना रुपी कार्ड रद्द करण्यासंदर्भात निवेदन 5 रोजी देण्यात येणार असून तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. सुभाष पाटील, निंबा पाटील, जिजाबराव पाटील, पांडूरंग पाटील, विलास पवार, नाना पाटील, आधार गढरी, धनंजय पाटील यांनी केले आहे.