उदगीर येथी वकिल मारहाणी प्रकरणी निषेध
अमळनेर । अमळनेरबार असोसिअनतर्फे अमळनेर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. 2 मार्च रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलिस स्थानकात औरंगाबाद उच्च न्यायालयाचे अॅड. अजिंक्य रेड्डी, व उदगीर स्थानिक अॅड. सावन परतापुरे, हे कामानिमित्त पक्षकारासोबत गेले असता त्यांना तेथील पोलिस निरीक्षकांनी अरेरावीची भाषा करत मारहाण करण्यात आल्याच्या निषेर्धात अमळनेर बार असोसिअशन बैठकीत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. झालेले कृत्य हे निंदनीय असून त्याचा निषेध म्हणून वकिलसंघाने आज 8 मार्च रोजी बहिष्कार टाकला आहे. यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र चौधरी, सचिव अॅड. प्रशांत संदानशिव, उपाध्यक्ष अॅड. राकेश पाटील, अॅड. किशोर बागुल, अॅड. रियाझ काझी, अॅड. नंदू सूर्यवंशी, अॅड. बडगुजर, व वकील संघाचे इतर सदस्य हजर होते.