जळगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्हा दौर्य्वर आहेत. अमळनेर, रावेर व जळगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होत आहेत. दरम्यान त्यांना अमळनेर येथे सभेसाठी जात असतांना पाडळसे धरणग्रस्तांनी काळे झेंडे दाखविले. मुख्यमंत्र्यांचा अमळनेर शहरात प्रवेश होताच पाडळसे धरणग्रस्तांनी निदर्शन करायला सुरुवात केली. त्यानंतर काळे झेंडे दाखविण्यात आले.