अमळनेरात मुख्याध्यापिकेच्या घरी चोरट्यांनी भरवली ‘शाळा’

पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीला : दुचाकी चोरीच्या तपासात घरफोडी उघड

अमळनेर : शहरातील प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल दोन लाख 88 हजारांचा ऐवज लांबवला. परीसरात झालेल्या दुचाकी चोरीचा तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी घर उघडले असता घरफोडी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची संधी पथ्थ्यावर
प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील या 30 जुलै रोजी शाळेतून परस्पर पुणे येथे माहेरी गेल्या. त्यानंतर गल्लीतील दुचाकी चोरी प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी घर उघडले असता घरफोडीची बाब उघडकीस आली. चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या, पाटल्या तसेच रोख आठ हजार असा एकूण दोन लाख 88 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. सीसीटीव्हीत चार अज्ञात चोरट्यांनी शनिवार, 6 रोजी पहाटे 3 वाजून 51 मिनिटांनी चोरी केल्याचे दिसून आले.