अमळनेरात रस्त्यावरील विद्युत पोलचा वापर जाहिरातींसाठी

0

अमळनेर । शहरात रस्त्याच्या बाजुला असलेल्या विद्युत पोलवर विविध प्रकारच्या जाहिराती लावण्यात आले आहे. त्यामुळे विद्युत पोल हे जाहिरात फलकांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या अमळनेर शहरात दिसून येत आहे. शहराच्या विविध भागात विशेषत: शाळा, कॉलेज परिसरातील विद्युत पोलवर फलक लावले असून त्यामुळे शहराचे सौंदर्यच धोक्यात आले आहे. अशा बेकायदेशीर फलक लावणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. विविध लघु उद्योजक खाजगी शिकवणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा व इतरांनी जाहिराती करण्याचे नव नवे फंडे सध्या अवलंबले आहेत.

नियमबाह्य जाहिरातींचा ओघ वाढला आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. वास्तविक विद्युत पोलवर जाहिरातींचे फलक लावण्यासाठी मनाई असून तो कायदेशीर गुन्हा असतानाही व्यवसायिक फलक कसे लावतात? हा असा प्रश्‍न पडला आहे. वार्‍यामुळे या फलकांची अवस्था दयनिय झाली असून फलकामुळे दुर्घना संभवण्याची शक्यता आहे. अनेकदा हे फलक लक्ष वेधून घेत असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना अडचण होते. त्यामुळे या जाहिराती करणार्‍यांवर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.