अमळनेर । पीपल्स रिपब्लिकन पार्टी अमळनेर यांच्यातर्फ सोमवारी सायंकाळी 4 वाजता नवजीवन एक्सप्रेस रोखून रेलरोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी भीमा कोरेगाव वढू दंगली प्रकरणी जातीयवादी संघटनेच्या हल्ल्यात जे भीम सैनिकाचा बळी गेला शासनाकडून 50 लाख रुपये मदत देण्यात यावी, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सामावून घ्यावे, खोट्या स्वरूपाचे दौजदारी गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, जातीय दंगलीला कारणीभूत असून ते मोकाट फिरत आहेत तरी त्यांना शासनाने अभय न मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करून कायदेशीर कारवाई करा, यासह भुसावळ येथील रेल्वे विभागाच्या जागेवर पूर्वीपासून रहिवास प्रयोजनार्थ रहिवासी असलेल्या रहिवाशांना त्याच जागेवर नियमकुल करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष आगळे, रवींद्र आगळे, सुकलाल खैरनार, महेंद्र आगळे, दिनेश आगळे, आनंद मोहिते, मधुकर आगळे, सुरेखा आगळे, मालूबाई आगळे, मंगलबाई मोहिते, गणेश आगळे, गुलाब कोळी, बापू आगळे, धनराज आगळे, प्रभाकर पान पाटील, पंडित गायकवाड, सचिन कोळी, विलास कोळी, सुनंदा पानपाटील, रवींद्र वानखेडे आदी उपस्थित होते.