अमळनेर। तालुक्यातील शेतकर्यांना त्वरीत कॅश उपलब्ध करून देण्यासाठी आज अमळनेर शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील शिवसेनेच्या वतीने अक्सीस बॅकेच्या एटीएम समोर हे आंदोलन करण्यात आले असून याबाबत सेंट्रल बॅकेच्या व्यवस्थापकांना फुलहार घालून निवेदन देण्यात आले तर शासकिय कार्यालयातील उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर संजय गायकवाड यांनाही विविध मागण्यासाठी निवेदन आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमुख अनिल अंबर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख प्रताप शिंपी, माजी नगरसेवक संजय पाटील, माजी शाहरप्रमुख नितिंन नीले, जीवन पवार, सुरजसिंग परदेशी, चंद्रशेखर भावसार, देवेंद्र देशमुख, राजेंद्र पाटील आदि उपस्थित होते.
सदरच्या निवेदनात शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, त्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, शेतीचे विज लोड शेडिंग कायम स्वरूपी बंद करून मुबलक विज मिळावी व विज बिल माफी मिळावी, 3 वर्षा पासुनचे थकित ठिबक अनुदान तात्काळ मिळावे,शेतकर्यांनी स्वतः पिकविमा भरून देखील नुकसान भरपाई मिळाली नाही ती तात्काळ मिळावी, शेतकर्यांना कापसाला सात हजार हमिभाव मिळावा,भूमिहीन, वृद्ध शेतकरी, अल्पभूधारक शेतकर्यांना निवृत्त वेतन मिळावे, संजय गांधी योजना, इतर शासकीय योजनाच्या तात्काळ मिटिंग होवून पात्र लाभ धारकाना लाभ मिळावा, कापसाचे 659 बीटी बियाणे तात्काळ उपलब्ध करून शेतकर्यांना वाटप करावे,शेतकर्यांना तात्काळ जिल्हा बँक किवा राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकर्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, एटीमकार्ड धारक शेतकर्यांना एटीमद्वारे पैसा उपलब्ध करून मिळावे आदी मागण्यांचे निवेदन दिले.