अमळनेरात 13 लाखांची बनावट दारू जप्त

0

अमळनेर : येथील चोपडा रोडवरील रेल्वे गेटजवळ मध्यप्रदेशातून 407 गाडीत पनवेलकडे जाणारी सुमारे 13 लाख रुपये किमतीची राज्यात प्रतिबंधित असलेली बनावट अवैध दारू व 6 लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांनी 18 रोजी दुपारी संयुक्त कारवाई करत पकडल्याने आतापर्यंत ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. येथील चोपडा रोडवरील रेल्वे गेटजवळ मध्यप्रदेश मधील बोरअंजटी येथून अमळनेरमार्गे पनवेल येथे जाणार्‍या 407 गाडी क्र (एमएच 04 एचडी 5811) ह्या गाडीतून राज्यात प्रतिबंधित असलेली चोपडा रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या खबरीवरून अडविण्यात आले.

मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक जी.जी.अहिरराव, डी.बी.पाटील, जी.डी.अहिरे, एन.आर.नन्नवरे, आर.डी.जंजाळ एन.पी.पाटील यांनी वाहनांची तपासणी केली. पो.ना. प्रमोद बागडे, सुनील पाटील, किशोर पाटील चालक सपकाळे यांनी ही गाडीची चौकशी केली वाहनात बॉम्बे स्पेशल व्हिस्की 750 मिलीच्या 1200 सीलबंद बाटल्या (100 बॉक्स), बॉम्बे स्पेशल व्हिस्की 180 मिलीच्या 10,000 सीलबंद बाटल्या (200 बॉक्स), रॉयल क्राऊन व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 120 सीलबंद बाटल्या (10 बॉक्स) एकूण 310 बॉक्स, प्लास्टिक चे रिकामे कॅरेट 150 नग, एक आयटेल कंपनीचा मोबाईल असा एकूण 13 लाख 90 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपी सलिम अहमद अन्सारी वाहनचालक रा.मुंबई याला अटक केली.