कारवाईने खळबळ ; 125 लीटर ताडीही केली जप्त
अमळनेर– शहरात बेकायदा गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळाल्यावरून त्यांच्यासह स्थानिक अमळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 200 किलो गांजासह सुमारे 125 लीटर ताडी पोलिसांनी जप्त केली. सकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील टाकरखेडा रस्त्यावरील ताडेपुरा येथे अशोक कंजर याच्या घरात छापा मारून 150 ते 200 किलो गांजासह मस्तानी भांगसारख्या अंमली पदार्थाच्या नशेच्या गोळ्या व ताडी जप्त करण्यात आली. ही कारवाई चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रफिक शेख यांच्यासह पोलीस पथकातील संजय पाटील, बॉडीगार्ड विलास गायकवाड , चंदू गोसावी, ईश्वर शिंदे, महिला पोलीस कर्मचारी रेखा ईशी, योगेश पाटील, मेघराज महाजन, सुहास पाटील, नरसिंह वाघ आदींच्या पथकाने केली.