अमळनेर- शहरातील बाबा बोहरी उर्फ अली अजगर बोहरी (54, न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्या खून प्रकरणी अटकेतील आरोपी मुस्तफा शेख मोहम्मद (24, जुन्या सरकारी दवाखान्यामागे, गांधल पुरा, अमळनेर), तनवीर शेख मुख्तार शेख (23, ख्वाजानगर, अमळनेर),तौफिक शेख मुनीर (23, गांधली पुरा, दुर्गा अळी मोहल्ला, अमळनेर) यांना अमळनेर न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींना अमळनेर पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर निरीक्षक अनिल बडगुजर यांनी गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे तसेच मुख्य आरोपीच्या शोधासाठी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी प्रांतांच्या वाहनावरील चालक
सूत्रांच्या माहितीनुसार या खुनातील संशयीत आरोपी तौफिक हा प्रांताधिकार्यांच्या वाहनातील काही महिने चालक असल्याची माहिती आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह तिघा आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून बोहरी यांच्या पंपावरील आठ लाखांची रोकडही त्यांनी लांबवली होती.