अमळनेर । अमळनेर व पारोळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून या दोन्ही तालुक्यात 50 पैशाच्या आत आणेवारी लावावी, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी पत्रकाद्वारे कळविले आहे. सदर पत्रात आमदार चौधरी यांनी म्हटले आहे की, यावर्षी जून व जुलै अखेर पावसाचे प्रमाण 50 टक्केपेक्षा कमी झाले असून अमळनेर तालुक्यात 27 टक्के तसेच पारोळा तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे.
त्यामुळे पिकांची वाढ व उत्पादन क्षमता कमी होऊन शेतकर्यांवर आर्थिक संकट आले आहे. तरी अमळनेर व पारोळा तालुक्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहता शासन निर्णय निकषानुसार तालुक्यात 50 टक्केपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.