अमळनेर तालुका शेतकी संघाच्या प्रशासकपदी साळुंखे

0

अमळनेर । येथील अमळनेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने मुदत संपुनही निवडणूक घेण्यास विलंब केल्याने सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी प्रशासक म्हणून डी.एल. साळुंखे लेखापरीक्षक यांची 29 एप्रिलपासून यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून तसे लेखी पमत्र देण्यात आले असून अमळनेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा व्यवस्थापक समितीचा कालावधी शुक्रवार 28 एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या नियमानुसार संस्थेने निवडणु्की संबंधीचे नमुना इ. 2 मधील माहिती समितीचा कालावधी पूर्ण होणाच्या सहा महिने अगोदर तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक यांच्या कडे सादर करण्याचे बंधनकारक केलेले आहे. परंतु संघाने नमुना इ. 2 मधील माहिती व पात्र मतदार यादी विहित मुदतीत सादर केलेली नाही. त्यामुळे शेतकी संघाची निवडणूक घेणेकामी हेतुपुरस्कर विलंब केला असून कायदेशीर अडचणी निर्माण केल्या आहेत.

व्यवस्थापक समितीचा कार्यकाळ पूर्ण
संस्थेने निवडणुकीची माहिती व प्राथमिक मतदार यादी विहित मुदतीत सादर न करून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 2014 नियम 6 (3) तील तरतुदींचे उलघन केले आहे त्यामुळे संस्थेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 आय 2 मधील तरतुदीनुसार कारवाही केली आहे संस्थेने अधिनियम, नियम, पोटनियम व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 2014 मधील तरतुदीप्रमाणे कामकाज पूर्ण केलेले नाही तसेच संस्थेची निवडणूक घेणेकरीता व्यवस्थापक समितीने मुदतीत कार्यवाही केलेली नाही व्यवस्थापक समितीचा कार्यकाळ पूर्ण झालेला खरेदी विक्री संघाच्या तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. स संस्थेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविण्यासाठी डी.एल.साळुंखे लेखापरीक्षक सहकारी संस्था शासक म्हणून नियुक्ती केली आहे.