अमळनेर । एकीकडे आजची तरुण पिढी मोबाईल इंटरनेटसह व्यसनामुळे शारीरिक दुर्बल होत असतांना आमदार शिरीष चौधरी यांनी ग्रामिणसह शहरी युवकांची शारीरिक क्षमता वाढविण्यासह त्यांच्या सुदृधतेसाठी गांव तेथे व्यायाम हा उपक्रम हाती घेतला असून शासनाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत एकूण 13 गावांत व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी मंजूर होवून बांधकाम पूर्णत्वास आले आहे तर आता नव्याने तलवाडे, आर्डी-अनोरे, रणाईचे आदी तीन गावांना व्यायाम शाळा बांधकामासाठी प्रत्येकी 7 लाख प्रमाणे निधी मंजूर झाला आहे. आमदार शिरीष चौधरी हे अमळनेर तालुक्यात आमदार म्हणून लाभल्यापासून सर्वांगीण विकासाचा प्रयत्न ते करीत आहेत.
ग्रामीणसह शहरातील असंख्य युवक व्यायामाचा कल
मतदार संघात विविध विकास कामांच्या माध्यमातून नवनिर्माण करण्यासोबतच मतदार संघातील प्रत्येक युवक मजबूत व सशक्त बनला पाहिजे ही त्यांची धारणा असल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या माध्यमातून व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत आतापर्यंत 13 गावांत नवीन व्यायाम शाळा उभ्या झाल्या असून याव्यतिरिक्त अजून 3 गावांना निधी मंजूर झाला आहे. तर अमळनेर शहरात संत सावता माळी व्यायामशाळा, जयगुरु व्यायामशाळा, दस्तगिर व्यायामशाळा, परवेज फाऊंडेशन याठिकाणी आधुनिक व्यायामसाहित्य देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीणसह शहरातील असंख्य युवक व्यायामासाठी आकर्षित होत असून व्यायामशाळांसह खेळांची मैदानांवर गर्दी होतांना दिसून येत आहे. सदर उपक्रमामुळे आ शिरीष चौधरी यांचेसह डॉ. रविंद्र चौधरी यांचे विशेष कौतुक होत असून युवकांचा तंत्रशुद्ध व्यायामाचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी गावागावात शिबिरे भरविण्याचा मानस डॉ. रविंद्र चौधरी व्यक्त केले.
बांधकामाचे अनेक कामे पूर्णत्वास
लोण खु !!, लोण सिम, लोण बु, देवगांव – देवळी, मेहेरगाव, गलवाडे बु, सुदरपट्टी, जैतपिर, बहादरपूर, कंकराज,जिराळी, किसान शिक्षण प्रसारक मंडळ झाडी, यशवंत माध्यमिक आश्रमशाळा पिंपळे बुद्रुक ही गावे पुर्णत्वास आलेली आहे. तर कलाली, पळासदरे, झाडी, निम, पाडसे, शेवगे, पुनगांव, पिपळे बु, अंचलवाडी, शिरूड, नगाव, खेडीढोक, तांदळी, अमळगाव, हिरापूर, मांडळ, जानवे, एकरुखी, हिंगोणे, सावखेडा, रढावण, जुनोने, रामेश्वर, फाफोरे, दापोरी, दोधवद,सारबेटे, दहिवद, टाकरखेडा, मुगसे, कुर्हे सिम, कुर्हे बु, ढेकू, मालपूर, गांधली, सडावण, खोकरपाट, म्हसले, मारवड, कळमसरे, खोंशी,रत्नापिंप्री, कावपिंप्री,गडंखाब, खेडी सिम, ही गावे प्रस्तावित आहेत.