अमळनेर नगरपालिकेचे स्थलांतर

0

अमळनेर । नगरपालिका रविवारी 28 रोजी 153 वा स्थापनदिन साजरी करत आहे. स्थापना दिनाचे औचित्य साधुन नगरपालिकेच शहरातील पालिका आवारात बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत नगरपालिका स्थलांतरीत झाली आहे. संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांच्या हस्ते फीत कापून नवीन पालिकेत प्रवेश सोहळा पार पडला. बीओटी तत्वावर बांधलेली तीन मजली सुसज्ज अशी हायटेक इमारत आहे. पालिकेच्या नवीन इमारतीचे प्रतिकृती पुण्यातील प्रसिद्ध वास्तूतज्ञ अभिजित शिंदे यांच्या कल्पकनेतुन साकारण्यात आली आहे. आठवड्याभरात नगरपालिकेच्या सर्व विभागाचे नवीन इमारतीत स्थलांतर होणार आहे.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
इमारतीत प्रवेशाचे फीत कापून शुभारंभ करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, अ‍ॅड.ललिता पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, रामभाऊ संदानशिव, मनोज पाटील, सुभाष भांडारकर, मनोज पाटील यांच्यासह शहर विकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका आदींची उपस्थित होती.

दरवर्षी 10 कोटींचे मिळणार
टीपी सर्व्हे मधील 60/1 मधील आरक्षण क्रमांक 108 मधील व्यापारी संकुल व प्रशासकीय इमारत भूमिपूजन 15 जुलै 2011 रोजी तत्कालीन आमदार साहेबराव पाटील, तत्कालीन नगराध्यक्ष नाना चौधरी, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, तत्कालीन मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे यांच्या कार्यकाळात करण्यात आले होते. बीओटी तत्वावर इमारतीचे बांधकाम करण्यात आले. बीओटी तत्वावरील हे काम पूर्ण झाले असून पालिकेच्या वाट्याला इमारत व 45 गाळे येणार आहे. यातून पालिकेला 10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

लिफ्टसह 8 लाखाचे फर्निचर
लिफ्ट बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीत सभागृह , मंत्रालय पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या दालनाला स्वतंत्र वातानुकुलीत यंत्र बसविण्यात आले आहेत. 14 खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. हायटेक इमारत असून शासनाच्या अध्यादेशानुसार 8 लाखाचे फर्निचर इमारतीत करण्यात येणार आहे. फर्निचर विकासकाने उपलब्ध करून दिले आहे.

अशी आहे इमारत
5 कोटी 34 लाख लाख रुपयांची ही वास्तू असून 24 हजार स्क़्वेअर फुट जागेवर त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. तळमजला, दुसरा मजला, आ तिसरा मजला असे तीन मजले आहे. 33 फुट लॉबी परिसर आहे. तीनही मजल्यावर स्वतंत्र महिला पुरुष प्रसाधन गृह त्यासोबत दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. नेहमीच्या व अतिमहत्वाचे विभाग तळमजल्यावर तर इतर विभाग दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर असणार आहे.