अमळनेर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

0

जात प्रमाणपत्र देण्यासाठी स्वीकारली आठ हजारांची लाच

अमळनेर- जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी आठ हजारांची लाच मागणार्‍या अमळनेर प्रांधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र आधार वाडे (आंबेडकर नगर, चोपडा) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केली. अमळनेर शहरातील 31 वर्षीय तक्रारदाराच्या मुलाला जात प्रमाणपत्र हवे असल्याने आरोपी वाडे याने आठ हजारांची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर जळगाव लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. आरोपी वाडेविरुद्ध एसीबीच्या पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.