अमळनेर मतदार संघातील रस्त्यांसाठी निधी मंजूर

0

अमळनेर। अमळनेर मतदार संघात दोन वर्षासाठी रस्ता देखभाल दुरुस्ती करणे आदी कामांसाठी 4 कोटी निधी मंजूर झाला असून यामुळे अनेक महत्वपूर्ण रस्त्यांना चालना मिळाली आहे. अमळनेर मतदार संघांतील काही रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने या रस्त्यावरून जातांना वाहनधारक व जनतेची मोठी गैरसोय होत होती. याचा परिणाम ग्रामीण भागातील विकासाच्या गतीवर दिसून येत होता. यामुळे कार्यकुशल आमदार म्हणून ओळख निर्माण करणारे आमदार शिरीष चौधरी यांनी रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यामुळे मतदार संघात विविध रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी शासनाने 4 कोटी भरघोस निधी मंजूर करून पावसाळ्यात निधीची उपलब्ध झाल्याने आमदार शिरीष चौधरी यांचे आभार मानले आहे.

खालील रस्त्यांचा निधीतून सुटणार प्रश्न
आमलामोड शहादा सांगवी हातेड अमळनेर पारोळा भडगाव रस्ता, पाळधी धरणगाव अमळनेर शिंदखेडा रस्ता, मेहेरगाव धुळे अमळनेर चोपडा खरगोन रस्ता, कलाली निभोरा पिंगळवाडे तावसे नंदगाव रस्ता, जाभोंरा ढेकू सारबेटे हेडावे अमळनेर मांडळ, लासुर हिंगोणा आकुलखेडा पांतोंडा दहिवद टाकरखेडा रस्ता, वावडे जवखेडा रणाईचे कावपिंप्री बहादरपूर पारोळा मंगरूळ धूळपिंप्री कासोदा रस्ता, बोळे मोंधांळे बहादरपूर फाफोरे अमळनेर धार मारवड निम कपिलेश्वर रस्ता, एरडोल कल्याणी पिंप्री सोनवद बाभूळगांव रूधाटी मठगव्हाण जळोद कलाली डांगरी बोहरा निम शहापूर भिलाली मुडी मांडळ रस्ता, गलवाडे जैतपिर चौबारी पाडसे स्टेशन, ढेकू राजवड पळासखेडे रस्ता आदी रस्त्यांचा समावेश आहे.