अमळनेर- आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांतून अमळनेर मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून निघत आहे. आता पुन्हा तालुक्यात ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अंतर्गत अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावांमध्ये काँक्रिट रस्ते, सामाजिक सभागृह, सभामंडप, गटारी, ग्रामपंचायत,स्मशान भूमी, आदिवासी समाजमंदिर, स्मशानभूमी रस्ता, संरक्षकभिंत, दफनभूमी, शौचालय, वाचनालय, यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे 5 कोटी रुपयांच्या विकास कामांना लवकरच मंजुरी मिळणार असून या कामांची लवकरात लवकर सुरुवात होवून ही कामे लवकरच पुर्णत्वास येणार आहे. ज्या गावातील सरपंच यांनी ठराव आमदार शिरीष चौधरींकडे दिलेले आहेत त्या प्रमाणे मूलभूत सुविधा पुरविणे अंतर्गत मंजूर होणार असून सर्व काम पारदर्शक होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून या साठी ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे व पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच मंजुरी मिळणार असून आमदार चौधरी यांनी मतदारसंघातील जीर्ण झालेल्या सर्व ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण करण्याचा ध्यास घेतला असून यामुळे अनेक गावात ग्रामपंचायत च्या अद्यायावत व आकर्षक इमारती उभ्या राहून गावाचा कारभार या नवीन इमारतीतून होऊ लागला आहे.