अमळनेर। शहरात धोकादायक व जुनी झाडे तोडण्याबाबत नागरिकांनी व व्यावसायिकांनी नगर परिषद, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे सुमारे 10 महिन्यापासून अर्ज करून देखील नगरपरिषदेने त्याबाबत कोणताही ठराव केलेला नसल्यामुळे एखाद्या मोठया वादळात शहरात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मान्सून पूर्व तयारीसाठी महावितरण कंपणी दरवर्षी विज तारांना अडसर ठरणार्या झाडे व फांद्यांची कटाई करीत असते मात्र अमळनेर शहरात 60 ते 70 वर्षांची तसेच वारूळ, बकाम, गुलमोहर आदी झाडे हि ठिसूळ असल्यामुळे लहान वादळातही कोलमडून जातात त्या अणुशगांणे शहरातील व्यावसायिक व नागरिकांनी रहिवासाच्या ठिकाणावर असलेल्या झाडाची तोडणी करण्याची मागणी केली.
प्रशासनाकडून जूनी व जिर्ण झाडे तोडण्याकडे दुर्लक्ष
नागरीकांकडून अशी मागणी केली असतांना त्याबाबत प्रशासन ह्याबाबत कुठलीही दखल घेत नसल्याचे दिसून येत असून एखादी घटना घडून जीवित हानी झालीच तर त्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे हे जुने झाड तोडण्याची परवानगी मिळावी किंवा नगरपालिका प्रशासनाने ती तोडावीत यापूर्वी जुने झाड तोडण्याबाबत ठराव केलेले आहेत. मात्र काही नागरिकांच्या अर्जाचा विचार केलेला नाही. दरम्यान आज 2 मे रोजी सुभाष चौक भागातील जि.प.च्या उपविभागीय पाणीपुरवठा कार्यालयातील आवारात असलेले झाड सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास वादळामुळे पडले. मात्र त्याठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही तरी नगरपालिका, तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी पावसाळा सुरु होण्यापूर्वी अशा झाडाची तोडणी अर्जावर विचार करावा, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.