अमळनेर शहरात दोन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग : संशयीताला अटक

अमळनेर : अमळनेर शहरात राहणार्‍या दोन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीताला अमळनेर पोलिसांनी अटक केली. असलम खान पठाण (देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे

शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग
अमळनेर शहरातील एका भागात 16 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी राहते. सोमवारी, 18 एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी ही तिच्या इतर दोन मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी पायी निघाल्यानंतर संशयीत आरोपी असलम खान पठाण (रा.देवपूर, धुळे) याने रीक्षा घेऊन विद्यार्थिनींचा पाठलाग करीत विद्यार्थिनीजवळ रीक्षा थांबवून अश्लील वर्तन केले. काही वेळेनंतर संशयीताने पुन्हा रीक्षाने पाठलाग करीत विद्यार्थिनींचा रस्ता अडवल व अन्य दुसर्‍या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तीनही विद्यार्थिनी घरी परत आल्यानंतर घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी असलम खान पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांच्या पथकाने संशयीत आरोपी असलम खान पठाण यास अटक केली.