अमळनेर शहरात सव्वा दोन लाखांचे बोगस बियाणे पकडले

0

चौघांना अटक ; कृषी विभाग व पोलीस पथकाची संयुक्त कारवाई

अमळनेर- शहरात बोगस बियाणे विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कृषी विभागासह ोलीस पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली तर दोन लाख 24 हजार 220 रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दिनेश शंकर महाजन, किशोर शामराव महाजन, नितीन रमेश चव्हाण, संदीप मधुकर साळी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांसह उपअधीक्षक रफिक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, नाईक विजय साळुंखे, रवींद्र पाटील, योगेश महाजन, बापू पारधी, संतोष पाटील, गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.